STD 3 MATATHI 2. सांबराची शिंगे QUESTION ANSWERS
STD 3 MATATHI 2. सांबराची शिंगे QUESTION ANSWERS
पाठ 2. सांबराची शिंगे
A. एका वाक्यात उत्तरे लिहा
प्र.1: सांबर कशासाठी नदीवर गेला होता?
उत्तर: सांबर पाणी पिण्यासाठी नदीवर गेला होता.
प्र.2: पाण्यात सांबराने काय पाहिले?
उत्तर: पाण्यात सांबराने आपली शिंगे पाहिली.
प्र.3: सांबराला स्वतःची कोणती गोष्ट आवडली?
उत्तर: सांबराला स्वतःची शिंगे आवडली.
प्र.4: सांबराला स्वतःची कोणती गोष्ट आवडली नाही?
उत्तर: सांबराला स्वतःचे पाय आवडले नाहीत.
प्र.5: अचानक काय आला?
उत्तर: अचानक वाघ आला.
प्र.6: वाघाला पाहून सांबर काय म्हणाला?
उत्तर: वाघाला पाहून सांबर म्हणाला, “अरे बापरे! वाघोबा… मला माझा जीव वाचवायला हवा.”
प्र.7: सांबराची शिंगे कशात अडकली?
उत्तर: सांबराची शिंगे वेलीमध्ये अडकली.
प्र.8: शेवटी सांबर कसे वाचला?
उत्तर: शेवटी सांबराच्या पातळ पायांमुळे तो वाचला.
प्र.9: सांबर शेवटी काय म्हणाला?
उत्तर: शेवटी सांबर म्हणाला, “माझ्या या काटक्यांसारख्या पायांमुळेच आज मी वाचलो.”
B. रिकाम्या जागा भरा
1. वा! काय _ _ , टवटवीत शिंगे आहेत माझी! | उत्तर: नाजूक
2. आणि पाय मात्र _ _ असूनच बरीक, | उत्तर: काटक्यासारखे
3. अरे बापरे! वाघोबा… मला माझा _ _ वाचवायला हवा. | उत्तर: जीव
4. पळतापळता, माझी शिंगे तर या _ _ अडकली. | उत्तर: वेलीमध्ये
5. देवाकर, मुरली पकडला _ _ वाचलो. | उत्तर: वाचलो
6. माझ्या या _ _ पायांमुळेच आज मी वाचलो. | उत्तर: काटक्यांसारख्या
7. पण हेच _ _ मला अडचणीतून वाचवणार आहेत. | उत्तर: पाय
C. चूक की बरोबर ते लिहा
1. सांबराला त्याची शिंगे आवडत नव्हती. उत्तर: चूक → बरोबर: सांबराला त्याची शिंगे आवडत होती.
2. सांबराला त्याचे पाय आवडत होते. उत्तर: चूक → बरोबर: सांबराला त्याचे पाय आवडत नव्हते.
3. वाघाला पाहून सांबर घाबरला. उत्तर: बरोबर
4. सांबराची शिंगे झाडात अडकली. उत्तर: बरोबर
5. सांबर शिंगांमुळे वाचला. उत्तर: चूक → बरोबर: सांबर पायांमुळे वाचला.
6. पातळ पायांमुळे सांबर वेगाने पळू शकला. उत्तर: बरोबर
D. कोण कोणास म्हणाले?
1. “वा ! काय नाजूक, टवटवीत शिंगे आहेत माझी!” | उत्तर: सांबर स्वतःशी म्हणाला.
2. “अरे बापरे! वाघोबा… मला माझा जीव वाचवायला हवा.” | उत्तर: सांबर स्वतःशी म्हणाला.
3. “पळतापळता, माझी शिंगे तर या वेलीमध्ये अडकली.” | उत्तर: सांबर स्वतःशी म्हणाला.
4. “देवाकर, मुरली पकडला वाचलो.” | उत्तर: सांबर स्वतःशी म्हणाला.
5. “माझ्या या काटक्यांसारख्या पायांमुळेच आज मी वाचलो.” | उत्तर: सांबर स्वतःशी म्हणाला.
E. नवीन शब्द व अर्थ –
शब्द | अर्थ
टवटवीत | ताजेतवाने
काटक्या | वाळलेल्या काड्या
अभिमान | गर्व, अहंकार
नावडती | न आवडणारी
F. या पाठातून काय शिकायला मिळते?
उत्तर: या पाठातून आपल्याला शिकायला मिळते की आपल्याला न आवडणारी गोष्ट सुद्धा कधीतरी उपयोगी पडते. त्यामुळे कधीही कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये.
सांबराची शिंगे- व्याकरणावर आधारित प्रश्न-उत्तरे
A. नाम ओळखा (Identify Nouns)
प्र.1: खालील वाक्यातील नामे ओळखा.
1. सांबर नदीवर पाणी प्यायला गेला. | उत्तर: सांबर, नदी, पाणी
2. वाघ अचानक आला. | उत्तर: वाघ
3. माझी शिंगे वेलीमध्ये अडकली. | उत्तर: शिंगे, वेलीमध्ये
प्र.2: प्राण्यांची नावे लिहा.
उत्तर: सांबर, वाघ
प्र.3: शरीराच्या अवयवांची नावे लिहा.
उत्तर: शिंगे, पाय, जीव
B. सर्वनाम ओळखा (Identify Pronouns)
प्र.1: खालील वाक्यातील सर्वनामे ओळखा.
1. मला माझा जीव वाचवायला हवा. | उत्तर: मला, माझा
2. माझी शिंगे आहेत. | उत्तर: माझी
3. मी वाचलो. | उत्तर: मी
C. क्रियापद ओळखा (Identify Verbs)
प्र.1: खालील वाक्यातील क्रियापदे ओळखा.
1. सांबर नदीवर पाणी प्यायला गेला. | उत्तर: प्यायला, गेला
2. मला माझा जीव वाचवायला हवा. | उत्तर: वाचवायला
3. शिंगे वेलीमध्ये अडकली. | उत्तर: अडकली
4. मी वाचलो. | उत्तर: वाचलो
D. विशेषण ओळखा (Identify Adjectives)
प्र.1: खालील वाक्यातील विशेषणे ओळखा.
1. वा! काय नाजूक, टवटवीत शिंगे आहेत! | उत्तर: नाजूक, टवटवीत
2. पाय मात्र काटक्यासारखे असूनच बरीक. | उत्तर: काटक्यासारखे
3. माझ्या या काटक्यांसारख्या पायांमुळेच वाचलो. | उत्तर: काटक्यांसारख्या
E. वचन बदला (Change Number)
एकवचन | अनेकवचन
1. शिंग | उत्तर: शिंगे
2. वेल | उत्तर: वेली
3. पाय | उत्तर: पाय
4. वाघ | उत्तर: वाघ
F. लिंग ओळखा (Identify Gender)
1. सांबर – उत्तर: पुल्लिंगी
2. शिंगे – उत्तर: नपुंसकलिंगी
3. वेल – उत्तर: स्त्रीलिंगी
4. नदी – उत्तर: स्त्रीलिंगी
5. वाघ – उत्तर: पुल्लिंगी
G. विरुद्धार्थी शब्द लिहा (Opposites)
1. आवडती × उत्तर: नावडती
2. वाचलो × उत्तर: मेलो
3. नाजूक × उत्तर: कठीण / जाड
4. टवटवीत × उत्तर: कोमेजलेले
H. समानार्थी शब्द लिहा (Synonyms)
1. जीव = उत्तर: प्राण
2. अभिमान = उत्तर: गर्व, अहंकार
3. टवटवीत = उत्तर: ताजेतवाने
4. काटक्या = उत्तर: वाळलेल्या काड्या
I. वाक्प्रचार – अर्थ लिहा
1. जीव वाचवणे = उत्तर: संकटातून सुटका करणे
2. अडचणीत येणे = उत्तर: संकटात सापडणे
J. वाक्य बनवा (Frame Sentences)
1. नाजूक – उत्तर: सांबराची शिंगे नाजूक होती.
2. अभिमान – उत्तर: सांबराला त्याच्या शिंगांचा अभिमान होता.
3. काटक्यांसारखा – उत्तर: सांबराचे पाय काटक्यांसारखे होते.
नवीन शब्द शिकू या.
कोमल = नाजूक, मखमली = मऊ, नितळ = स्वच्छ, मोहक = सुंदर, हरखून = आनंदून, भारावून, रंगून.